
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
सरपंच,उपसरपंच,ग्रा. प.सदस्य,ग्रामसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,आमदार,खासदार सर्व गेले का पंढरपूरच्या वारीला? .
संगमवाडी ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच सर्व गावकऱ्यांनी बिनविरोध दिली .सर्वच्या अपेक्षा सरपंचवर व ग्रा. प.सदस्य यांच्यावर खूपच होत्या. सरपंच झाल्यावर हे करून दाखविल ,ते करील असे मोठ मोठे आश्वासन दिले.सरपंच सोबत उपसरपंच म्हणून पंचायत समिती सदस्य यांच्या पत्नी ला उपसरपंच केले .तरीही सरपंच व उपसरपंच व पंचायत समिती सदस्य यांना संगमवाडी गावासाठी मुख्य रस्ता आणखी करता आला नाही. ग्रामीण भागातील जनतेच्या मुख्य ३ गरजा असतात रस्ते,लाईट ,पाणी जर गावातील रस्ते च बरोबर नाहीत तर ,गावातील फिल्टर प्लांट आणखी बंद च आहे पावसाळ्यातील पाणी शुद्ध वापरायला पाहिजे त्यासाठी गावात पाणी फिल्टर आहे पण ते पण जाळ्यांचे घरचं बनले आहे.
रस्ता व नाले अल्पशा पाऊस होता खड्डेमय झाला असून या रस्त्याने चालताना जीव मोठे धरून रस्ता पार करावा लागतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा रस्त्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याशिवाय रस्ता होणार नाही की काय असा संताप जनक सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर अक्षरशः काही ठिकाणी तळे साचले तर काही ठिकाणी रस्त्याने जाताना पुढील चांगला रस्ता गाठण्यासाठी तळ्यात पोहुन जावे लागेल की काय अशी शंका चालणार्यांना येत आहे या त्रासाला कंटाळलेल्या या रस्त्याची कटकटी कधी संपणार असे खडे बोल सुनावले जात आहेत. रस्त्यासाठी शेतकरी ,वाहन चालक नागरिकांचा उद्रेक होण्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावून एखांदा संभाव्य अपघात होण्यापूर्वी खडे मय रस्त्या पासून नागरिकांची सुटका करावी अशी गावातील जनता म्हणत आहे.
जेव्हा जेव्हा पंचायत समिती,जिल्हा परिषद,आमदार,खासदार चे निवडणुका असतात तेव्हा गावकऱ्यांचा एकच प्रश्न असतो आमचा मेन रोड पासून गावात यायचं रस्ता कधी बनवता .तर आश्वासन देतात आम्ही निवडून आले की देऊ.निवडणूक झाली की कोणीही गावाकडे बघायला तयार नाही.
रस्त्यात साचलेल पाणी व चिखोल यात शाळेला जाणारी लहान मुले घसरून पडत आहेत .तरीही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे का? हा संतप्त सवाल आहे .