
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे संतोष राजगुरू यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे त्यांनी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक म्हणून गेल्या पंधरा-सोळा वर्षापासून समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्रभर सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली सावता परिषदेच्या माध्यमातून समाज संघटन केले आहे .
समाजामध्ये खूप मोठा त्यांचा त्याग आहे व रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया जागतिक लेवलला आरोग्य प्रदान करणारी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा-सोळा वर्षापासून जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत औषधोपचार सेवा वारकऱ्यांना पुरवली जाते या सेवेमध्ये सुद्धा मेडिकल असिस्टंट म्हणून त्यांनी खूप धडपड व तळमळ जास्तीत जास्त वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी ते आग्रही असतात या सेवेचे फळ म्हणून गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांची या संस्थेने रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया स्वस्तिक संस्थेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदी त्यांची निवड केली आहे संत शिरोमणी सावता माळी महाराज तीर्थक्षेत्र आरण या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा व समाज संघटित व्हावा म्हणून कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष राजगुरू खूप या कार्यामध्ये सक्रिय असतात तसेच संत शिरोमणी सावता माळी महाराज सेवाभावी नेस तीर्थक्षेत्र आरणचे ते विश्वस्त आहेत.
इंदापूर तालुक्यातल्या सर्व सामाजिक कार्यामध्ये समाजाच्या कार्यामध्ये सर्वात पुढे जाऊन या कार्यत ते मग्न असतात गोरगरिबांच्या अल्पसंख्याकांच्या ओबीसीच्या मागण्यासाठी वेळोवेळी त्यांनी कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला आहे .याच कार्याची दखल घेऊन संतोष राजगुरू यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पुरस्काराने येणाऱ्या 13 तारखेला त्यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे .
भारत देशाचे माजी उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम ही संस्था केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली भारतभर कार्य करते. संतोष राजगुरू यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला आहे घराला कुठलाही वारसा नसताना त्यांनी हे सर्व स्वतःच्या कर्तुत्वाच्या द्वारावरती व सावता परिषदेच्या आशीर्वादामुळे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांना वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली व समाज संघटन कार्यामुळे त्यांना या नॅशनल पुरस्काराने सन्मानित दिल्ली या ठिकाणी करण्यात येत आहे यापूर्वी संतोष राजगुरू यांना सन २०११ तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी सेवा समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१२ सातारा जिल्ह्याने महात्मा फुले समाजभूषण पुरस्काराने ,सन २०१३ क्रांती सिंह नाना पाटील पुरस्काराने क्रांतीसिंह नाना पाटील स्मृती समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेचा क्रांतीसिंह नाना पाटील स्मृती पुरस्कार गौरवण्यात आले आहे. सन २०१४ रोजी देशभक्त बाबू गेनू या पुरस्काराने यांच्या जन्म गावी माळुंगे पडवळ या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१५ जीवनगौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्काराने सन्मानित, सन २०१६ युवा महात्मा फुले समाज रत्न या पुरस्काराने सन्मानित, सन २०१७ कुशल संघटक या पुरस्काराने सन्मानित, सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे माजी केंद्रीय माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब व लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर मीरा कुमार यांच्या शुभ हस्ते ते दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित २०१९ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार खानवडी या ठिकाणी इजराइलचे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते सन्मानित इंदापूर तालुका महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठानने समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
संतोष राजगुरू अनेक सामाजिक कार्यात खूप जोमाने सक्रिय असतात या दिले या ठिकाणी १३ जुलैला होणाऱ्या कार्यक्रमासाठी अनेक केंद्रीय मंत्री व लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर मीरा कुमार नेपाळ सरकारचे खासदार मंत्री उपस्थित राहणार आहेत सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांचा इंदापूर तालुक्यामध्ये व महाराष्ट्रातून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे साहेब साहेबांनी फोनवरून अभिनंदन केला आहे तसेच प्रदेश महासचिव मयूर वैद्य प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजीव काळे प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी पुणे महानगरचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल कोदरे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई गिरमे पिंपरी चिंचवड महानगर चे जिल्हाध्यक्ष चेतन दादा वाघमारे व संपर्कप्रमुख शिवाजी व्यवहारे अनेक पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे व समाजामध्ये सर्व स्तरातून संतोष राजगुरू यांचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे.