
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मंठा / प्रतिनिधि-
यावर्षी ईद-उलअज्हा व आषाढी एकादशी एकत्र आल्याने सर्वधर्म लोकांनी शहरात एकमेकांच्या सन्मान राखता एकत्र येऊन सामाजिक सलोखा राखुन शहरात दोन्ही सन मोठ्या उत्साहात साजरा झाले शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला खूप सहकार्य केले व एकमेकांना शुभेच्छा ही दिल्यात.
( निरीक्षक संजयजी देशमुख, पोलीस ठाणे मंठा )
शहरात ईद-उल्ल अज्हाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ईद उल अजहा ( बकरी ईद ) हा मुस्लिम बांधवांचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. मुस्लिम धर्मात बकरी-ईद सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण असेही म्हणतात. रमजानच्या पवित्र महिन्याच्या 70 दिवसांनी बकरी-ईद ( ईद उल अज्हा ) साजरी केली जाते.
ईद-उल-अजहा (बकरी ईद) आज संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात व महाराष्ट्ररभरात साजरी करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात आपल्या हिंदू बांधवाची आषाढी एकादशी हे दोन्हीही सण एकाच दिवशी असताना देखील शहरातील जातीय सलोखा कायम राहिला हे मंठा शहराची पहिल्यापासूनच संस्कृती आहे . ईदगाह मैदानासह शहरातील अनेक मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. ईदची नमाज झाल्यानंतर याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन एकमेकांशी घाटी भेटी केल्या . यावेळी आपल्या देशाची अवस्था पाहता संपूर्ण जगासहित विशेषतः आपल्या भारत देशाच्या सर्व नागरिकांना रोजगार मिळावा व सर्वांनी सुख , शांतीतेत राहावे यासाठी विशेष दुआ केली.
मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी स्वतःहून लक्ष देऊन विशेषता शहरात गस्त लावला व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालभीम राऊत, पोलीस उप निरीक्षक आसमान शिंदे यांनीही आपल्या संपूर्ण स्टाफसह ईदगाह मैदानावर व शहरात ठीक ठिकाणी मस्जिदींच्या समोर प्रगंनात संपूर्ण बंदोबस्तची व्यवस्था केली होती . याप्रसंगी पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या मात्र पावसामुळे लोकप्रतिनिधिंची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली.