
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : पुणेकरांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. पुण्यात सर्वात जास्त डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जून अखेर राज्यात डेंग्यूचे १ हजार १४६ रुग्ण सापडले होते. त्यातील ३०५ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत.
इतर जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात आले आहे.
पुण्यात डेंग्यूचे ३०५ रूग्ण आढळून आले असून त्यातील १४७ रुग्ण शहरातील आहेत. यातील पिंपरी-चिंचवडमध्ये २७ रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिकेच्या परिसरात ५२ आणि ग्रामीण भागात १०५ असे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत. मुख्य म्हणजे, चिकुनगुन्याचेही सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.
एकट्या पुणे जिल्ह्यात चिकनगुन्याचे १८७ रुग्ण आढळून आले आहेत. यातील पुणे शहर ११२, तर पिंपरी-चिंचवड २ आणि पुणे ग्रामीणमध्ये ७३ रुग्ण आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णांत राज्यात पुणे टॉपमध्ये आहे. सध्या पावसामुळे साथींच्या रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासह नागरिकांच्या मनात चिंतेची आणखीन एक भर पडली आहे.