
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी- पंकज रामटेक
दि.१० जुलै रविवार सकाळी रोजी
आराध्य भगवान श्री पांडुरंगाच्या उपासना उत्सवाची ओळख असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने
भगवान श्री विठ्ठलाची पालखी घुग्घुस येथील विठ्ठल मंदिरापासून वढा येथील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली, पाऊस असूनही या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. भाविकांमध्ये भक्तीभाव दिसून आला. पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात पालखी थांबवण्यात आली, भाविकांनी भगवान श्री हनुमानजींचे दर्शन घेतले, यादरम्यान हिंदू जागरण मंचातर्फे फराळाचे वाटप करण्यात आले, वढा गावातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन मिरवणुकीची सांगता झाली. आषाढीनिमित्त विशेष आनंदाचे वातावरण होते.