दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे एका घुसलेल्या अज्ञात तिघांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील ७१ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना १० जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दामोदर परबतराव धुमाळे हे वृद्ध घरी पत्नीसह होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना घराच्या कडी-कोयंड्याचा आवाज आला.त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला, तोच तीन अज्ञात त्यांच्या घरात शिरले. ↑ यावेळी त्यांनी चाकूचा धाक दाखवून ा धुमाळे यांच्या पत्नीच्या अंगावरील ७१ ने हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. या प्रकरणाचा तपास पोनि चोरमले हे न करीत आहेत.
दरम्यान धुमाळे हे वृद्ध दांम्पत्य घरात एकटेच राहत असल्याची पक्की द्व माहिती चोरट्यांना होती. चोरीच्या न घटनेनंतर धुमाळे पती-पत्नीने आरडा ा ओरडही केला. परंतू तो पर्यंत चोरटे . पसार झाले होते.
