
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
इंगळी येथील कुमार आणि कन्या विद्या मंदिर या शाळेतील पहिली ते सातवी प्रर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल पालखीची मिरवणूक काढली.लेझिम ,ढोल ताशाच्या गजरात विविध वेषभूषा करून पालखी सोहळा काढणेत आला.सदर मिरवणूकीत विठ्ठलाची गाणी, भजन,अंभग सादर करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढणेत आली.
खास करून!! विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकतांना तहान भूक हरली!!या भक्क्ती गीतावर लेझिमचा ठेका धरून नाचत मुलांनी नागरीकांची मने जिंकली.गावात मुलांच्या वारकरी दिंडीमुळे भक्तीमभ आणि विठृठलमय वातावरणात झालेले होते.सर्व शिक्षक शिक्षिका वगावातील नागरीक सहभागी झाले होते.
विठ्ठल विठ्ठल, हरी आमच्या गजरात शाळकरी मुलांची वारकरी दिंडी व विठ्ठल रूक्मिणीच्या वेषातली लहान मुलं मुली दिंडीत खास आकर्षीत दिसत होती.