
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर –
येथील पोलीस सरंक्षण यंत्रणा तपास कामात कुचराई करीत असल्याचे फिर्यादी यांच्या चर्चेतून पुढे येत आहे आशीच एक मिसींग केस दि.८, जुन रोजी दाखल असून याचा तपास चालू असल्याचे पोलीसा मार्फत सांगण्यात येते मात्र एक महीना जवळपास उलटले तरी हि त्याचा तपास कांही लागेना म्हणून किंनगावच्या वर्दीला झाली सर्दी आशी म्हण्याची वेळ आली आहे.
याबाबत माहीती आशी की, दि ७ जुन रोजी हरवल्याची तक्रार अजय भालेराव रा.गंगाहिप्परगा ता.अहमदपूर यांनी दिली होती त्यानुसार किंनगाव पोलीसांनी दि.८ जुन रोजी ही तक्रार दाखल करून घेतली. त्यात तक्रारदार यांनी त्यांची बहीन नामे – शिलन नामदेव गायकवाड वय – ३० वर्षे व सोबत मुलगा नामे – साई नामदेव गायकवाड रा. गंगाहिप्परगा ता.अहमदपूर हे दोघे हरवले असल्याची मिसिंग केस दाखल केली मात्र या बाबत कसलाही तपास अध्याप पर्यंत लागला नाही असे तक्रारदार अजय भालेराव यांनी सांगीतले तेव्हा किनगावच्या वर्दीला झाली सर्दी पोलीस तपास कामी कुचराई करतात आशीच चर्चा होतांना दिसते या हरवलेल्या व्यक्तीचा नोंदणी क्र.०००५/२०२२ असा आहे.