
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर :- उदगीर नगरपालिका व्यापारी संकुलाचे बिल्डर यांच्या विरोधात गाळे धारकांनी दुसरेधरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले या अगोदरही गाळे धारकांनी सुनील ट्रेड सेंटर विकासक यांनी आपण दिलेल्या पावत्या खोट्या आहेत असे म्हणून व पुर्ण पैसे देऊनही अगाऊ पैशाची मागणी करत असल्याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार देवूनही विकासक दाद देत नाही म्हणून मे महिन्यात धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी विकासकाला नोटीस बजावली परंतु त्यालाही विकासक दिपक पाटील यांनी केराची टोपली दाखवली व परत जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलून परत रजिस्ट्रे्या करणे चालू केले यावर चिडून गाळेधारकांनी शांततेतत दुसरे आंदोलन पार पाडले.
या आंदोलनाच्य प्रमुख मागण्या
1) मुख्याधिकारी वर्ग एक चे लिज करण्याचे अधिकार जाणीवपूर्वक अग्निशामक दलाचे क्लास थ्री चे कर्मचारी यांना बेकायदेशीरपणे देण्यात आलेले आहेत त्याची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी
2) विकासक जाणीवपूर्वक सदर प्रकरण लांबणीवर टाकून माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे भासवून नवीन रजिस्ट्री करार करून देऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे त्यांच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3) माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दोशी कर्मचाऱ्यावर कार्यवाहीचे आदेश देऊनही अद्याप संबंधित कर्मचाऱ्यावर कसलीही कार्यवाही झाली नाही या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे कारण हे कर्मचारी चौकशीमध्ये अडथळे आणून प्रकरण लांबविण्याचे व विकासाला पूरक काम करण्याचे काम करत आहेत
4) विकासक शासकीय कामात असहकार्य करून अडथळा आणत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
1) शिल्लक असलेल्या सर्व गाळेधारकांच्या रजिस्ट्री एकाच वेळी एकाच दिवशी करून देण्यात याव्यात
2) सील केलेली दुकाने संबंधित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सीलबंद ठेवण्यात यावीत.
3) पुनमवार यांच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.
4) विकासक खोट्या पावत्या दिल्याचे सांगून गाळेधारका कडून अवाढव्य रकमेची मागणी करत आहे त्याची चौकशी करण्यात यावी.
5) विकासकाच्या सर्व व्यवहाराची चौकशी करण्यात यावी.
6) विकासक ज्यादा पैसे मागत असल्यामुळे रजिस्ट्री साठी आवश्यक ते पैसे नगरपालिकेने आमच्या कडून घेऊन आम्हाला रजिस्ट्री करून द्यावी.
7) काही गाळेधारका कडून रोखीने पैसे घेऊन पावत्या दिलेल्या आहेत पण विकासक या पावत्या बोगस असल्याचे सांगत आहे त्याची चौकशी व्हावी.
या मागण्या करण्यात आल्या व यां मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांना देण्यात आले.यावेळी त्यांनी नगर परिषदेचे कर्मचारी आल्टे यांना बोलावून योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या आंदोलनात सुभाष जे पुन्नमवार, विवेक होळसंबरे,सुरेखा कडगे, संजय बिराजदार, बालाजी कट्टेवार, बालाजी बाराहत्ते, महेश मंदाडे, जयश्री बिरादार, नागनाथ महाजन, एजाज जरगर,प्रविण हुरुसनाळे यांच्यासह अनेक दुकानं मालकांनी सहभाग घेतला.