
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत होणारा औषधांचा तुटवडा दुर करा…
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या आरोग्य केंद्रामध्ये लासुर स्टेशनसह परिसरातील १५ ते २० गावांतील जवळपास दररोज कित्येक रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र या आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने, नागरिकांना उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत सदर रुग्णांना शासकीय व हक्काचे असलेल्या आरोग्य केंद्राचा आधार आहे मात्र रुग्णांना याद्वारे पाहिजे ते आवश्यक उपचार आरोग्य केंद्राकडून मिळत नसल्याने नाईलाजास्तव रुग्णांना खाजगी दवाखान्यामध्ये जावे लागत आहे. यासाठी येणारा खर्च गोर-गरीब जनतेला परवडत नसल्याने, रुग्णांची मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सदर आरोग्य केंद्रामध्ये रुग्णसंख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने औषधांच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण केला जात असुन, याबाबतीत प्रचंड
तक्रारी आहेत परंतु संबंधित आरोग्य केंद्राकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचे
समजते. तसेच सदर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करणेही आवश्यक आहे करीता प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन मधील रिक्त असलेल्या पदांची तातडीने भरती करणेबाबत तसेच सतत होणारा औषधांचा कृत्रिम तुटवडा दुर करुन, रुग्णांना आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देणेबाबत संबंधितांना तात्काळ आदेशित करण्याचेही आ.बंब यानी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कळवले आहे.