दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतीतील पिके पुर्ण पाण्याखाली बुडाले असुन तात्काळ संबंधित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे
जूनमध्ये कमी पाऊस आणि जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. या दोन्ही परिस्थितीत शेतकर्यांवर दुहेरी साजवट. शेतीसाठी दुष्काळ किंवा जास्त पावसाची गरज नाही.नांदेड जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर येथे शेतकऱ्यांनी कापुस हाळद मुग उडीद ज्वारी सोयाबीनची पेरणी केली होती. बियाणे उगवण अवस्थेत होते, त्या दरम्यान अतिवृष्टीमुळे पाणी भरले आणि पीक नष्ट झाले. पेरणी दरम्यान कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी 2000 रोज पेरण्यासाठी औताला दिला व जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने पेरणी केली महाग आणलेले बियाणे व त्यात हि अतिवृष्टी त्यामुळे शेतकरी हवादलीत झाले असुन शेतकऱ्यांना मागे विहीर तर पुढे आड आशी परिस्थिती उद्भवली असुन तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी केली आहे.
