
दैनिक चालु वार्ता निरा नरशिंहपुर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 337 वा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरहुन देहूकडे परतीच्या प्रवासात असून, इंदापूर शहरात पालखी सोहळ्याचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.16) स्वागत केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पालखी सोहळा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला.
या पालखी सोहळ्याचा शुक्रवारी (दि.15) रात्रीचा मुक्काम वडापुरी येत होता. त्यानंतर शनिवारी सकाळी पालखी सोहळा इंदापूर शहरात दाखल झाला, यावेळी हर्षवर्धन पाटील मान्यवरांनी पादुकांचे दर्शन घेतले. याप्रसंगी संत तुकाराम महाराज देहू संस्थांच्या वतीने संस्थांचे माजी अध्यक्ष ह.भ.प.बापूसाहेब मोरे महाराज (देहूकर) यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाने परतीच्या पालखी सोहळ्या सोबत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, कैलास कदम, पै. दत्तात्रय पांढरे आदी उपस्थित होते. इंदापूर येथील विसावा संपवून पालखी सोहळ्याने लासुर्णे कडे प्रस्थान ठेवले. शनिवारी रात्रीचा पालखी सोहळ्याचा मुक्काम लासुर्णे येथे राहणार आहे. दरम्यान, श्री क्षेत्र देहूला पालखी सोहळा सोमवार,दि. 24 जुलै रोजी दाखल होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.