
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
किवळा:- किवळा ता. लोहा राष्ट्रीय महामार्ग एम.एच.50 हा रस्ता किवळा गावाच्या मध्यभागातून मधून केला आहे. दोन्ही बाजूस फिफ्टी-फिफ्टी घरे असल्यामुळे महामार्ग कार्यालय नांदेड यांनी गावात सर्विस रोड दिला नव्हता पण आता पाठपुरावा केल्यामुळे गावाच्या दोन्ही बाजूस सर्विस रोड होत आहे. पण नालीच्या बाजूस महावितरण चे विद्युत पोल उभे आहेत ते सर्विस रोडला अडथळा येत आहे. वारंवार सूचना देऊन पण महावितरण कार्यालय याकडे लक्ष देत नाहीत. दि16/07/2022 रोजी जीपचे टायर फुटून विद्युत पोलवर आदळली.हा मोठा अनर्थ टळला नसता तर जीवावर बेतला असता. महामार्ग कार्यालय नांदेड यांनी वेळीच लक्ष घालून पोल हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी किवळा येथील नागरिकांनी केली आहे.