
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
घुग्घुस नगरपरिषदेला बरेच महिन्यांपासून चार (४) मुख्यधिकारी झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता अतिरिक्त आर्थिक व्यवहार थांबले आहे. फक्त दाखल देण्यापूर्तीच पालिका उरली आहे .
घुग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीनंतर दहा महिन्यानंतर कायमस्वरूपी अर्शिया जुही मुख्याध्यापिका मिळाल्या. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी भद्रावतीचे मुख्याधिकारी पिदुरकर यांना तात्पुरता प्रभार देण्यात आले.तर काही दिवसांतच चंद्रपूर येथे कार्यरत साळवे त्यांनी आर्थिक व्यवहार हाती घेण्यापूर्वी नायब तहसीलदार खंडारे,त्यानंतर नायब तहसीलदार गादेवार तर गुरुवारी परत भद्रावतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे तात्पुरता प्रभार स्वीकारला आहे.
घुग्घुस नगर परिषदेला स्थायी मुख्याधिकारी नसल्याने पालिकेतील विविध कामासाठीचे आर्थिक व्यवहार अडकले. गावातील विकासाची कामे अडली आहे.साफसफाईंकडे दुर्लक्ष होत आहे.