
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मलकापूर (प्रतिनिधी):- तालुक्यातील ग्राम लोणवडी येथील कु.भुमी नितिन वराडे हिने इंडियन टॅलेंट ओलीम्पिक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याने लोणवडी ग्रामपंचायतच्या वतीने भुमी चा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.प्रियांका श्रीकांत खर्चे, उपसरपंच परीक्षित खर्चे, ग्रा.पं सदस्य, कृष्णा बावस्कार, योगेश बावस्कार, प्रमोद गोरे आदी सदस्यांनी बक्षीस देऊन सत्कार केला, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश बऱ्हाटे, प्रकाश खर्चे, पुंडलिक बावस्कार, सोपान बऱ्हाटे, सुभाष पाटील, सुरेश वाघ, धीरज खर्चे, विठ्ठल बावस्कार, प्रवीण वाघ, विजय सोनोने, योगेश बावसकर, सचिन कोलते, पांडुरंग पाटील, श्रीकांत खर्चे, नाशिक गोरे, अर्जुन बावस्कार यांनी कु.भूमी ला बक्षीस दिले, यावेळी प्रकाश वराडे, मधुकर वराडे, विजय बावस्कार, रवींद्र पाटील, कृष्णा बावस्कार, अजय बावस्कार, नितीन वराडे, राजेंद्र बावस्कार यांच्यासह आदी गावकरी मंडळी उपस्थित होते, सर्वांनी भूमीला पुढील वढचालीस शुभेच्छा दिल्या.