
दैनिक चालु वार्ता दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर
गेल्या सात ते आठ दिवस चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला .या पावसामुळे नदी नाल्या तुडूंब भरल्या तर काही ठिकाणी मार्ग बंद पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. अश्यातच मार्गावर शेंकडों ट्रक उभे झाले.दरम्यान बल्लारपूर – राजुरा मार्गावर पुरामुळे अडकलेल्या ट्रक चालकांना जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती पाटील यांचे सुचनेनुसार बल्हारपूर महसूल प्रशासनाच्या वतीने शिवभोजन केंद्रांमार्फत ट्रक चालकांना जेवणाचे पार्सल पुरविण्यात आले. या वेळी बल्लारपूरचे तहसिलदार संजय राईंचवार, नायब तहसिलदार सतीश साळवे, संवर्ग विकास अधिकारी किरण धनवडे, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, पुरवठा निरिक्षक कु. प्रियंका खाडे, शिव भोजन केंद्र चालक तसेच रास्त भाव दुकानदार या शिवाय महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.रस्त्यावरील संकटात अडकलेले कोणी उपाशीपोटी राहू नये याची प्रशासनाने जातीने दखल घेतली.हे येथे उल्लेखनिय आहे.