
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुरस्थीत माणिकगड सिमेंट सध्या क्रमांक दोन चे युनिट असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील सिमेंट उत्पादनासाठी शासनाने घाई घाईत 17 .8 .1981 ला दि सेंचुरी टेक्स ली मुंबईला २० वर्षाकरीता चुनखडी खनिजासाठी खाणपट्टा भुपुष्ठ अधिकार ६४३.६२ हेक्टर मंजुर केला यामध्ये खाजगी जमीन ६३.६२ हेक्ट. दिली मात्र ताबा प्रकीया संशयीत चुकीच्या पद्घतीने भुमापन मोजणी किवा वन अधिनियम आदीवासी जमीन संरक्षण कायदा नियम बस्ताना टाकून कंपनीच्या सोयीनुसार करार झाला मायनिंग प्लान नकाशाच्या आधारावर २००१ , २०२१,मध्ये मुदतपूर्व नुतनीकरण करीत २०३१पर्यंत उत्खननासाठी रान मोकळे करूण दिले मात्र स्थानिकाचे व आदीवासी . व कोलाम बोटावर मोजावे इतकेच कुंटूब या भागात उरले असताना कश्या पध्दतीने शोषन छळ होत असताना शासन प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने शासनाच्या राष्ट्रीय संपत्ती महसुल बुडाला याला जबाबदार कोन? असा प्रश्न सुजान नागरीक विचारू लागले आहे अनेक वर्षापासुन हा संघर्ष सुरू असून प्रशासन गप्प असल्याने मोठ्या शंकेला वाव निर्माण झाली आहे शेतच कुंपन खात असल्याने न्याय कुठे मागायचा असा प्रश्न आदीवासी पुढउभा आहे जंगु मडावी चिन्ना आत्राम यांचे बांम्बेझरी क्षेत्रात सर्वेन, ४४.४५. ४७.४८ चे शेतजमीन मालक असताना याच्या अज्ञानपणाचा कंपनीने फायदा घेत३हे १५ आर जमीन भुपुष्ठ अधिकार व कोलामाच्या संमती न घेता मंजुर क्षेत्राबाहेरील जमीन बळकाऊन अवैध बांधकाम व चुनखडी उत्खनन केल्याचा अनेक तक्रारी महसूल व पोलीस प्रशासनाकडे दिल्या मात्र दाद दिल्या गेली नाही अखेर या कुंटूबानी वनमजुरी वन उपज यावर पोटाची भुक शमविण्यासाठी पाळी आली लहान मुलाबाळाचा ५, ७लोकाचा परिवार असल्याने हक्काची जमीन गेल्याने जंगु मडावी यांनी ८.१० गांज्याची झाडे लावली निर्वाह साठी मात्र पोलीसानी धाड टाकून अटक केली जिल्हा न्यायलयात जामीन नाकारला त्यामुळे तो गेल्या७महिण्यापासून . तुरूगांत आहे कुंटूबाची वाताहत झाली जनसत्याग्रह संघटनचे अध्यक्ष आबिद अली यांनी मडावी कुंटूबाची अवस्था पाहून नागपूर खंडपिठात संग्राम सिरपुरकर यांचे मार्फत जामीनसाठी अर्ज दाखल केला वरील कोलामाची जमीन खदानीत आल्याचा व उत्खनन झाल्याचा अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी तलाठी यांनी दिला भुमापन मोजनी नकाश्यामध्ये खदान अशी नोंद भुमापकाने केली तहसिलदार हरीष् गाडे यांनी मौका पाहणी केली मात्र कंपनी नियमबाह्य कामे करत असताना कार्यवाही ला विलंब का असा सवाल मडावीकुंटूबाने केला आहे अनुजाती जमाती प्रतिबंधक कायदयाने कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही करा अशी मागणी जोर धरत असून आदीवासी समाजाचे अरुण उदे भावराव कन्नाके जंगा पेदोर केशव कुडमेथे प्रताप वेडमे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे