
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
लोहा – गेल्या आठवड्यात पाच – सहा दिवस सतत पाऊस चालु होता तर भर धो – धो पडणाऱ्या पावसात सुध्दा महावितरण कर्मचाऱ्यांनी निळा गावात विज पुरवठा सतत सुरळीत ठेवला व गावातील ग्रामस्थांच्या महावितरणच्या समस्या सोडविल्याने निळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महावितरण कार्यालय सोनखेड अंतर्गत सहाय्यक अभियंता सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निळा येथे वरिष्ठ तंञज्ञ राजेश पांचाळ , ज्ञानेश्वर मोरे यांनी मागील पावसात पुर परीस्थिती निर्माण होऊन पण या परीस्थितीचा सामना करत परीश्रम घेत निळा या गावांसाठी सतत विजपुरवठा सुरळीत ठवण्याचे कार्य केल्याने निळा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच बालाजी गजले , उपसरपंच गजानन मोरे , हनुमंत मोरे , दशरथ मोरे , मकरंद गिरी , पांडुरंग बाचेवाड , हरीभाऊ बाचेवाड आदिंची कर्मचाऱ्यांचा सत्कार व सम्मान केला.