
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा. कराळे
कोणत्याही खासगी विमा कंपन्यांकडून विमा घेतला असता त्यांची शंभर टक्के पूर्तता केली जाते मग तोच विमा शेतकऱ्यांनी घेतला असता त्यांची रक्कम मात्र शंभर टक्के न देता केवळ ७० टक्के एवढीच दिली जाते, ही तफावत दूर करून ती रक्कम शंभर टक्के देऊन शेतकऱ्यांवरील हा अन्याय तात्काळ दूर करावा अशी मागणी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली आहे.
सन २०२२ या वर्षात अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन पिक विमा या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. डॉ. राहूल पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर मराठवाडा कृषी विद्यापीठाने पिक विम्यासाठी जे निकष ठरवून दिले आहेत, त्या अनुषंगानेच पिक विमा कंपन्यांनी व महाराष्ट्र शासनाने सदरची योजना राबवून शेतकरी वर्गाला शंभर टक्के जोखिम स्तर वाढवून द्यावा, अशी विनंती आ. पाटील यांनी विमा कंपन्या व महाराष्ट्र शासनालाही केली आहे.