
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
सावळी सदोबा:-आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील बहुतांश गावांमध्ये एका खाजगी कंत्राटदाराकडुन सचिव व सरपंचांना हाताशी घेऊन कामे न करताच बिले काढण्याचा सपाटा लावला आहे,सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून आर्णी पंचायत समितीच्या एका माजी सदस्यांच्या पतीराजाला सोबत घेऊन मागील दोन वर्षापासून ठेकेदारी या व्यवसायात उतरलेल्या सावळी सदोबा परिसरातील एका ठेकेदाराने कामे न करताच बिले काढण्याचा सपाटाच लावलेला आहेत,उघडी गटार,सुरक्षा भिंत,शेततळे,सिमेंट प्लग बंधारे,पांदन रस्ता खडीकरणाची कामे करणाऱ्या या ठेकेदाराने नुकत्याच सुभाषनगर येथे सिमेंट प्लग बंधारा या कामाची मंजुरी येऊन कामे न करताच सदर कामाचे दोन मस्टर टाकण्यात आलेत,सदर प्रकार गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर गावातील नागरिकांनी सदर कामासंदर्भात तक्रार दिल्याने संबंधीत ठेकेदाराचे मस्टर थांबविण्यात आले असुन, झालेला प्रकार लक्षात आल्याने खूप मोठा अनर्थ टळला अशी चर्चा सावळी सदोबा परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे,असाच प्रकार मौजा माळेगांव ग्रामपंचायतीमध्ये घडलेला असून,अश्याच वाईट मार्गाने कमवलेल्या पैशाचा आणि राजकीय बळाचा वापर करून सदर ठेकेदाराने सन २०१९ मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उघड्या गटारीचे काम मंजूर करून घेतली असून त्याही कामाचे कामे न करताच ४ मस्टरची उचल केलेली आहे.आजही ते काम प्रतीक्षेत आहेत,असीच बोगस कामे करून या ठेकेदाराने खूप मोठी मोहमाया जुळवलेली आहेत.अशा ठेकेदाराची तक्रार करण्यास सावळी सदोबा परीसरातील नागरिक धजावत असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहेत