
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे एकूण ३० गावांचा संपर्क तुटला आहे. डोंगर उतारावरील संरक्षक भिंत कोसळून दगडं रस्त्यावर आली आहेत. संरक्षक भिंत आणि दरड कोसळल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. ओसाडे आणि सोनपूर या गावांच्या सीमेवरील डोंगर उतारावर ही दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाहि. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाट रस्त्याच्या परिसरात दरडींचा धोका अधिक दिसून येत आहे. नागरिकांनी अशा ठिकाणांहून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.