
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन १९८२ साली म्हणजेच ४० वर्षापूर्वी बांधलेली जीर्ण अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे इमारत पूर्णपणे गळत आहे. सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत आहेत. अक्षरशः दवाखान्यात पाण्याचे डोह साचले आहेत. कर्मचाऱ्यांना रेनकोट, छत्री लावून काम करावे लागत आहे. कधी इमारत कोसळेल सांगता येत नाही. दवाखान्याची इमारत दुरुस्ती करण्यात यावी व नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावी. रुग्णांच्या उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायतीसह विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनेने माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर, जिल्हाआरोग्य अधिकारी लातूर, तहसीलदार जळकोट, गटविकास अधिकारी जळकोट, तालुकाआरोग्य अधिकारी जळकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रूग्णांना आरोग्य केंद्रात थांबण्यासाठी देखील जागा शिल्लक नाही. रूग्णांचे बेड पावसाने भिजले आहेत. रूग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे येथील वैधकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या व रूग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र पाऊस बंद होईपर्यंत बंद ठेवावे किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही होत आहे. अतनूर गाव लातूर-नांदेड जिल्हा सरहद्द सीमावर्ती तथा महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना राज्य सरहद्द सीमावर्ती टोकाशी असलेले दरी, डोंगर, डोंगराळ आदीवस्ती, गाव-वाडी-तांडा-वस्तीसह वसलेले आहे. येथे परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जा.प.सदस्य, पं.स.सदस्य, ४८ गावागावातून ग्रामसभा ठराव सह सरपंचाने व नागरिकांच्या स्वाक्षरी निवेदनाद्वारे मागणीने सन १९८२ साली म्हणजेच ४० वर्षापूर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ४२ गावांतर्गत ३८ हजार लोकसंख्ये करिता ५ उपकेंद्र अन्वये स्थापना करण्यात आले.
यांची स्थापना जिल्हा परिषद लातूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचा दवाखाना असून त्या अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, घोणसी, तिरूका, सुल्लाळी, डोंगरगाव, मरसांगवी, रावणकोळा, हळदवाढवणा, कोळनूर, लाळी (बु.), लाळी(खु.), मंगरूळ, सोनवळा, खंबाळवाडी, शिवाजीनगर, भवानीनगर, रामपूर तांडा वाडी वस्ती सह पाच उपकेंद्राचा यात समावेश आहे. अतनूर गावात दर मंगळवारी मोठा आठवडी बाजार भरतो.तसेच मोठी बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूची खेडे, तांडा-वाडी-वस्तीने गाव वसल्याने दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या दैनंदिन असते. या गावांतर्गत रुग्णांना आरोग्य केंद्र सोईस्कर पडतो.मात्र सन १९८२ ला नवीन इमारत बांधकाम करून ४० वर्षांपूर्वीचे बांधकाम असल्यामुळे दवाखान्याची इमारत खूप जुनी जीर्ण झाल्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असून इमारत पूर्ण गळत आहे. छताला भेगा पडल्यामुळे छताचे तुकडे अंगावर पडत आहेत. औषधी रजिस्टर, कपाट, फ्रिज यावर पाणी गळत आहे. त्यामुळे दैनंदिन कामात कर्मचाऱ्यांना देखील अडचणी येत आहेत. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विधुत प्रवाह उतरून शॉक मारत आहे. त्यामुळे रूग्णांना याचासुध्दा धोका होऊ शकतो. संभाव्य पाण्यात शॉर्टसर्किट होण्याची भीती आहे. दवाखाना दुरुस्ती करण्यायोग्य असेल तर पंधराव्या वित्त आयोगातून बजेट असल्यास दवाखाना दुरुस्त करण्यात यावा, विशेष बाब म्हणजे या आरोग्य केंद्राची आजपावेतो जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अनेक वेळा शासकीय व निमशासकीय अभियंता, ठेकेदार, गुत्तेदार, मजूरदार संस्था, सुशिक्षित बेकार अभियंता यांच्या नावाने अंदाजपत्रक पत्रकाप्रमाणे काम न करता. थातूर-मातूर, निकृष्ट दर्जाची दुरूस्ती कामे दाखवून लाखोंची दुरूस्ती बील देयके मोजमाप पुस्तकात नोंद घेऊन कोटीच्या घरात रोख रक्कम ऊचलण्यात आली हे विशेष होय. त्यामुळे या आरोग्य केंद्राची सतत देखभाल दुरूस्ती न करता नवीन ईमारतीचे अंदाजपत्रक तयार करून यास शासन स्तरावर या मतदारसंघाचे लोकसम्राट, विकास कामातील कार्यतत्पर माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नवीन ईमारतीचे बांधकाम बजेट मंजुरी आणावी.अशा मागणीही होत आहे.तसेच औषधी, फ्रिज, कार्यालयीन रजिस्टर यावर पाणी पडत असल्याने उपचारासाठी पर्याय व्यवस्था करावी. अशी मागणी अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, उपसरपंच बाबू कापसे, ग्रामपंचायत सदस्या सौ.लीना पाटील, सौ.दैवशाला पाटील, सौ.आरती संगेवार, सौ.पुजा कोकणे, संजीवनी गायकवाड, सदस्य प्रभूराव गायकवाड, विठ्ठल बारसुळे, रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (आठवले) जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेचे व युवासेनेचे जळकोट तालुका समन्वयक मुक्तेश्वर येवरे-पाटील, संभाजीराव पाटील, भाजपाचे सूर्यकांत पांचाळ, किशन मुगदळे यांनी केली आहे.