दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:
वसमत येथे भारतीय जनता पार्टी तर्फे लोकसभा प्रवास कार्यक्रमाचे व बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसमत विधानसभा चे *प्रभारी मा.रामदास पाटील* *सुमठाणकर* यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.देशात नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांना विविध योजना काढलेल्या आहेत त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहविण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे आहे. आणि ते प्रत्येक कार्यकर्ताने जनतेपर्यंत पोहचावे . भारतीय जनता पार्टी चे विचार प्रत्येक नागरिकाला पर्यंत पोहचले पाहिजे . गाव तेथे शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन मा. रामदास पाटील सुमठाणकर पाटील साहेब यांनी केले.
तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वसमत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा व भविष्यात लोकसभा आणि विधानसभाच्या तयारी लागा असे निर्देश दिले .
भारतीय जनता पक्ष हा एक पारिवारिक संघटन आहे, जनेतचे व पक्षाचे कार्य करणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल घडवण्यासाठी प्रेरणादायी विचारांच्या पदाधिकारी यांना योग्य संधी देतील असे प्रतिपादन रामदास पाटिल यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने अनेक महत्वाकांक्षी योजना आखल्या गेल्या आहेत त्याचा लाभ हा सर्वसामान्य लोकांना कसा मिळेल याची काळजी कार्यकर्त्यांना घ्यायची आहे असे हि सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.उज्वलाताई तांभाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद मंडल, शिवदास बोड्डेवार , नाथराव कदम,जेष्ठ नेते श्रीकांत नाना देशपांडे, फुलाजी शिंदे,तालुका अध्यक्ष खोब्राजी नरवाडे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी जाधव, विलास रायवाडे, सौ.जयश्री कदम, डॉ.अवधुत शिंदे,शिवहार नरवाडे, नगरपालिका उपाध्यक्ष सिताराम मान्येवार, पंचायत समितीचे सभापती धोसे, रघुनाथ सुर्यवंशी,प्रभाकर रेंगे, विजय नरवाडे, विलासराव पाटील, मदनराव नादरे,कुमार वारे, सुनिल बागल, अक्षय भोसले, अरविंद खराटे, प्रमोद नादरे, प्रल्हाद साळवे, गजानन मोरे, ज्ञानेश्वर मुंजाळ, आकाश बोकण,सर्व तालुक्यातील पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि तळागाळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. रामदास पाटिल यांनी तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याला, नाउमेद होऊ न देता त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यांच्या मार्गदर्शन व पाठबळ मिळाल्याने कार्यकर्त्या
मध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
