
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी, चिरानगरची भुतं, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह तर फकिरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता यासारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या पुण्यतिथी जिल्हा परिषद शाळा पांगरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. डी. बटलवाड सर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भरत पवार , उपाध्यक्ष गणेश बुद्रुक , सहशिक्षक श्री गोंड ई बी ,सहशिक्षिका सौ श्रीमंगले आर डब्ल्यू ,सर्व सदस्य पालक विद्यार्थी उपस्थित होते.