
दैनिक चालू वार्ता रायगड – म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा : म्हसळा तहसिल कार्यालयमार्फत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी झाडांना पुरवठा करण्यात आला.
तहसीलदार समीर घारे यांचे हस्ते तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यांचेकडे झाडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी तहसीलदार समीर घारे यांनी वृक्षारोपण करणे बरोबर लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करणे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार समीर घारे यांच्यासह निवासी नायब तहसिलदार जी.एम. तेलंगे,नायब तसीलदार धनराज पाटील, मंडल अधिकारी रवींद्र उभारे,तालुका कृषी अधिकारी मंगेश साळी, तलाठी के .एन.पाटील,डॉ.मुकादम, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर मोहिते, आडे सर, केंद्रप्रमुख नरेश सावंत,राहुल नाईक, नितीन माळीपरगे, प्रकाश मांडवकर मुख्याध्यापिका शुभदा दातार, शिक्षक रमेश जाधव,विजय घाडगे, सुमित्रा खेडेकर, प्राची मुद्गुल, जयसिंग बेटकर,प्रशांत मोरे, विक्रांत पवार , दिलीप शिंदे ,भानुदास राठोड उपस्थित होते.