
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षेत म्हसळा तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा चा ईयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार फरहान समीर अत्तार हा एकमेव विद्यार्थी नवोदय परिक्षेत चमकला आणि त्यांची निवड हायस्कूल रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ईयत्ता ६ वी मध्ये प्रवेश मिळवला. फरहान अत्तार याचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्यांने १ ली ते ४थी पर्यंत शिक्षण रा जि प कन्या शाळा म्हसळा नंबर – १ या शाळेतून पूर्ण केले. पुढील शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा या हायस्कूल मध्ये चालू होते. सध्या त्याची जवाहर नवोदय परिक्षेत निवड झाली आहे. या बाबत शाळा स्कुल कमेटी अध्यक्ष समिर बनकर, सर्व सदस्य, सदस्या, तसेच मुख्याध्यापक. पी.एल. हाके यांनी कौतुक केले. मार्गदर्शक वर्गशिक्षक श्री.संजय वसावे, वसंत कामडी , रविंद्र गांगुर्डे, लालचंद सहारे आणि ईतर शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. फरहान अत्तार याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.