
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे १०० खाटाचा रुग्णालय असून रक्त तपासणी साठी नमुना मुखेड येथील रुग्णालयात पाठवण्यात येते,रक्त अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा विलंब होत असल्यामूळे रुग्णाचे खूप बेहाल होत आहे व उपचारासाठी उशीर होत असून खाजगी रक्त तपासणी केंद्रात जावे लागते. त्यामळे गरजू रुग्णाची आर्थिक पिळवणूक होत आहे.असे निवेदन दिगंबर कौरवार (भाजपा देगलूर बिलोली विधान सभा प्रमुख ),मनोहर देगावकर, राहुल पेंडकर ,नामदेव थडके,किरण उल्लेवार ,विकास मोरे पाटील ,योगेश राऊलवार, तुकाराम कोकणे, मारोती पवार आदीच्या उपस्थितीत होते उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट देऊन निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर स्वतंत्र रक्त तपासणी केंद्र चालू करणे अशी मागणी करण्यात आले .