
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी-गोविंद पवार
लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शिवा संघटना तालुका शाखा लोहाच्या वतीने लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या आदेशानुसार शिवा संघटना तालुका शाखा लोहाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून लोहा तालुक्यात संततधार पाऊस चालू असुन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांच्या बाजुने असलेल्या जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे याची तत्काळ शासनाने दखल घ्यावी व पंचनाम्यात वेळ न घालवता तात्काळ लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार इतकी मदत द्यावी अशी विनंती शासनाला केली आहे.
जर शासनाने लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्यास शिवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची दखल घ्यावी असा इशारा ही निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनमंत भाऊ लांडगे, देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे, वाळकेवाडीचे सरपंच राजू महागावकर, शेवडीचे सरपंच बसवेश्वर धोंडे, पिंपळगाव ढगे चे उपसरपंच किशन पाटील ढगे, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष साधु पाटील वडजे, शिवा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे, रवि होळगे, राजकुमार पिलोळे,सुर्यकांत आणेराव, अंकुश सोनवळे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.