
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद शहरातील वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या गुन्ह्यातून नाव काढून टाकण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
अण्णासाहेब शिरसाठ असे आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. याने तक्रारदाराकडे गुन्ह्यातील नाव काढून टाकण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारताना अण्णासाहेब शिरसाठ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.