दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा शहरातील श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेतील आदर्श शाखा श्री संत गाडगे महाराज विद्यालय लोहा या ज्ञानालयात मातोश्री मुक्ताई धोंडगे सभागृहाच्या गुराखीपीठावरुन हा स्फूर्तिदायक उपक्रम आज राबविण्यात आला. मन्याड अन् गोदा खोर्यातील रक्षाबंधना निमित्त देशभक्तीमय स्फूर्तिदायक उपक्रमातून ३३३३ राख्या अन् ३३३३ सदिच्छापत्र व सोबत १५ फुट महाराखी भारतीय सीमेवर पाठविण्याचा उपक्रम गेली ८ वर्षांपासून अखंडीत सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी सुरू ठेवले आहे.या वर्षी ९ वे वर्ष आहे सकाळी ७:४५ वाजता प्रार्थना संपताच या देशभक्तीमय उपक्रमाची वाटचाल विशद करण्यासाठी मला पाचारण केले.या वेळी अथांग अध्ययन सागरापुढे मन्याड व गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमाची वाटचाल शालेय विद्यार्थ्यांपुढे मनोगतातून मांडतांना भारतीय सैनिकांच्या असिम त्यागाचे वर्णन करुन दरवर्षीच ३३३३ राख्या अन् ३३३३ सदिच्छापत्रा सोबत १५ फुटी महाकाय राखी १५|२० बटालियनकडे कंधार पोलीस स्टेशन येथून वंदनीय उमरज संस्थानचे मठाधिराज ह.भ.प.श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज उमरजकर यांच्या अध्यक्षतेखालील व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय डाक विभागा मध्यस्थीने भारतीय सीमेवर रवाना होतात. प्रस्तुत विद्यालय संत गाडगे महाराज यांच्या कार्याची साक्ष देण्यासाठी व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब व मातोश्री मुक्ताई धोंडगे ही माता व पुत्राची जोडी यांनी कांकाडी ता.नांदेड येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आशीर्वाद कीर्तनातून मिळविला .त्यावेळी संत गाडगे महाराज यांनी म्हटले होते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्यांचा लागे त्रिलोकी झेंडा,असे उद्गार काढून आशीर्वाद देतांना कंधारला येण्याचे अभिवचन दिले होते.पण कंधारला भेट देण्या आधिच वंदनीय गाडगे महाराज यांनी जगाचा निरोप घेतला.म्हणून गाडगे महाराजांची स्मृति तेवत ठेवण्यासाठीच मातोश्रींच्या आज्ञेनुसार श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेनी गाडगे महाराज यांच्या नावे प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालय अशी ज्ञानालये काढून त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करुन मानाची कोटी-कोटी जयक्रांति केले,या वेळी उत्कृष्ट सुत्रसंचलन पर्यवेक्षक बी.डी.जाधव सर यांनी केले तर माझा परिचय डिजीटल शिक्षक अमुल शेंडगे सर करुन दिला.त्यानंतर वर्ग ८ वा वर्ग ९ वा या दोन तुकडील विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुंदर कसे करावे याचे मार्गदर्शन केले.हस्ताक्षरवरुन गुण कसे ओळखावे याचे तंत्र सांगितले.कल्पक अक्षरातून विद्यार्थ्यांची नावे काढुन देऊन अक्षरावर लक्ष केंद्रित करुन हस्ताक्षर सुंदर करण्याच्या टिप्स दिल्या.दोन तास विद्यार्थ्यीनीस मार्गदर्शन करुन आजचा दिवस खुप आनंदात गेला.या प्रसंगी प्रस्तुत ज्ञानालयाचे आदर्श मुख्याध्यापक मा. दिलीपराव बोधगीरे सर,उपमुख्याध्यापक मा.अनिल जाधव सर,पर्यवेक्षक बी.डी.राठोड सर व बी.आर.पाटील सर,महिला प्रतिनिधी सहशिक्षिका सौ.हराळे जी.एन.मॅडम, सौ.गायंगी के.एल.मॅडम, सौ.कागणे एच.एस.मॅडम,सौ.इंगोले आर.बी.मॅडम, सौ.एम.टी.निंपुलवाड मॅडम, घोरबांड,लुंगारे एस.जी,सर, व्ही.आर.सर,मराठी विषयाचे एम.एस.सूर्यवंशी सर,ईश्वर शेट्टे सर,मामडे,नवघरे डी.एम.सर, जी.एम.पाईकराव एस.पी.सर,गीरी सर,राजेशजी रुमाले सर,शिंदे सर,शिक्षकेतर बंधु माधवराव डुबुकवाड व विनोदराव शिंदे,अनिल लोखंडे आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.
