
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने बांठिया अहवाल मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच जल्लोष आता पुणे, नाशिक, पंढरपूर, उस्मानाबादसह संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात आहे.या निकालाचे आज इंदापूर तालुक्यातील विविध ओबीसी संघटनांनी व निमगाव केतकी मध्ये ओबीसी बांधवांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
त्यामुळे खऱ्या अर्थाने आज ओबीसी समाजाला न्याय मिळाला अशी भावना यावेळी निमगाव केतकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.माणिक आबा भोंग यांनी व्यक्त केली.