
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
ऐतिहासिक पन्हाळा गडावर आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने दुतोंडी बुरुज येथे कडेलोट आंदोलन करण्यात आले गड संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारची पूर्तता होत नसल्यामुळे आंदोलन आज छेडण्यात आली आंदोलक पुरातत्व विभागात गेले असता अधिकारी हजर नव्हते यावेळी खुर्ची व टेबल घेऊन आंदोलक दुतोंडी बुरुज येथे पोहोचले असता आंदोलकांनी टेबल व खुर्च्या व फाइल्स गडावरून खाली टाकण्यात आली. यावेळी पुरातत्त्व विभागच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .या आधी सुद्धा पुरातत्व विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे आंदोलन आज पन्हाळा येथील करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष उत्तर संदीप यादव जिल्हा संघटक निलेश सुतार, शहराध्यक्ष अभिजीत भोसले जिल्हाध्यक्ष दक्षिण रुपेश पाटील, अभिजीत कांझर, दत्तात्रय चौगुले ,विश्वास गायकवाड, भगवान कोइंगडे, स्वप्निल यादव, युवराज जाधव, योगेश जगदाळे ,बशीर मुतवली आदी आंदोलन उपस्थित होते याप्रसंगी
पन्हाळा पोलिसांच्या कडून योग्य ती दक्षता घेण्यात आली पन्हाळा चे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर , गोपनीय अंमलदार गणेश पाटील, विकास केर्लेकर ,शिवाजी जाधव आधी उपस्थित होते.