
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वामनराव कराळे
भारत सरकारच्या अनुमतीने चलनी व्यवहारात कार्यरत असलेले रुपये दहा आणि विस चे शिक्के देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह भारतभर सर्वत्र उपयोगात आणले जात आहेत परंतु तेच नाणे महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात स्वीकारले जात नाही. त्यामुळे प्रारंभी ज्या ज्या लोकांनी हे नाणे वापरात आणण्यासाठी स्वीकारले होते, ती सर्व नाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडे तशीच अडगळीत पडून आहेत ज्यामुळे संबंधीत नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. भारत सरकारनेच चलनात आणलेले हेच नाणे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाड्यात न स्वीकारणे म्हणजे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल शिवाय हा सरळ सरळ राजमुद्रेचाच अवमान केला जातोय, असं नाही का वाटंत ?
नुकताच परभणी जिल्ह्यातील सेलू या तालुक्याच्या ठिकाणी स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद ची शाखा स्टेट बैंक ऑफ इंडिया मध्ये मर्द करण्याचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ही बाब लक्षात आणून दिली त्यावेळी असा कोणताही आदेश रिझर्व्ह बँक किंवा भारत सरकारकडून आला नसून तो एक गैरसमज पसरवला जातोय असे स्टेट बैंक ऑफ इंडिया चे सेलू येथील शाखा व्यवस्थापक आनंद धावडे यांनी सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की,ज्या तथाकथित लोकांनी गैरसमज पसरवून चलनात असलेले नाणे बंद केले ते रुपये दहा व वीसचे नाणे तात्काळ चलनात म्हणजेच वापरात सुरु करावेत असे आवाहनच उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनाही केले.
मुंबई-पुण्यातील नागरिक जेव्हा आपल्या गावी येतात तेव्हा त्यांना हा विदारक अनुभव येतो. रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून ज्यांनी हा गैरसमज पसरवला त्याची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे व चलनापासून वापरात बंद असलेले रुपये दहा व विस चे नाणे तात्काळ चलनात आणण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.