
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
कोकमठाण येथे गंगागिरीजी महाराज यांच्या 175 व्या सप्ताहाचे धर्म ध्वजारोहण उत्साहात
गंगापूर – आशिया खंडातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह ज्याची गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेला यावर्षी कोकमठाण या पवित्र तिर्थक्षेत्री नेहमीच्या सप्ताहाच्या प्रथेप्रमाणेच हा ध्वज उंच हवेत दिमाखात फडकला गेला. कोकमठाण तालुका कोपरगाव येथे आज महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहण हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या प्रसंगी हजारो उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत हा अखंड हरिनाम सप्ताह ‘लेने को हरिनाम देने को अन्नदान’ या उक्ती प्रमाणे सुरू केला. अखंड हरिनाम सप्ताह हे तर सद्गुरु चे धर्मकार्य आहे हे आपण सर्वांनी तन मन धन लावून पुढे सुरू ठेवले पाहिजे, गंगागिरी महाराज यांनी अध्यात्मिक वारकऱ्यां सह समाजाला एक नवी दिशा दिली. योगीराज गंगागिरी महाराज यांची ही सप्ताहाची परंपरा दोनशे वर्षापासून अविरत सुरू आहे महाराष्ट्रात अनेक परंपरा खंडित झाल्या मात्र आपले स्वतःची परंपरा अविरत सुरूच राहील असे महाराज म्हणाले.
यावेळी
जंगलीदास महाराज आश्रमाचे रमेश गिरी महाराज, आमदार आशुतोष काळे, विवेक भैय्या कोल्हे, माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष साबेर भाई खान, बाळासाहेब संचेती, विशाल संचेती, नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक कडू भाऊ काळे, राजेश परजणे, कमलाकर कोते,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, दत्तु खपके, आदींसह बेटातील शिष्य गण पंचक्रोशीतील हजारो वारकरी भाविक, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह,सर्व पोलीस प्रशासन, महसूल प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.