
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी
जालना तालुक्यातील एरंडवडगाव या ठिकाणी दि. 15 जुलै रोजी रात्री देवीलाल सिल्लोडे यांच्या परिवारावर गुंड प्रवृत्तीचे विजय शिंदे, सुधाकर शिंदे, तुकाराम शिंदे यांच्या सोबत असलेले इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धारधार शस्त्रांनी हत्याकांड घडऊन आणले. यात सुमनबाई देविलाल सिल्लोडे (वय 55), मंगेश देविलाल सिल्लोडे (वय 25 ) या मायलेकरांची क्रूर हत्या करण्यात आली. तसेच या क्रूर हल्ल्यात देविलाल सिल्लोडे, योगेश सिल्लोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. ते जिल्हा रुग्णाल्यात उपचार घेत आहेत. या क्रूर हल्ल्यातील सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन त्यांच्याविरुद्ध तात्काळ आरोपपत्र दाखल करुन फास्टट्रॅक कोर्टद्वारे कठोरात कठोर शिक्षा करावी तसेच देवीलाल सिल्लोडे यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनातर्फे दहा कोटी रुपयांची मदत करण्यात यावी आणि फरार असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद च्या वतीने पोलिस अधीक्षक व जिल्हा अधिकारी केशव नेटके यांना निवेदन देऊन केली निवेदनावर सुरेश गंगासागरे महाराष्ट्र प्रदेश सचिव, गणेश शिंदे जिल्हा अध्यक्ष, आसाराम आहीरे जिल्हा संघटक , राहुल करनाडे सामाजिक कार्यकर्ते , गणेश चंदोडे सामाजिक कार्यकर्ते ,जालिदर वाघमारे जि सचिव, नंदा पवार, दामोधर ठोंबरे ता अध्यक्ष , रामेश्वर लोंढे ता उपाध्यक्ष ,आदी होते