
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी राजूरा-प्रदिप मडावी
राजूरा
राज्यात गेली 10 ते 12 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपुर जिल्हात अनेक ठिकाणी ढग फुटी झाली. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली आहेत. अति पाऊसामुळे शेती खरवळुन गेली. त्यामुळे नुकतीच काही दिवसापुर्वी पेरणी झालेली पिके वाहून गेली असुन शेती करण्यायोग्य राहलेली नाही. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. ग्रामिण भागातील नदी, नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात गेल्याने जिवनावश्यक वस्तु पाण्यात बुडाली. त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांची कच्ची घरे पडल्याने त्याचे निवाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश देऊन संबंधित शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्याची योग्य कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.