
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकुर ता.प्रः-कोविडमुळे मृत्यू पावलेल्या घरातील कर्ता पुरुष जाण्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.चाकुर शहरातील शेख निषाद ताजोद्दीन या महिलेचे पती शेख ताजोदीन कोविडच्या दुसऱ्या लाटेत त्यांना आपले जीव गमवावे लागले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाक्याची आहे.कुटुंबात लहान तीन मुले आहे.कर्ता पुरुषांचा आधार जाण्याने कुटुंब निराधार झाले आहे.कुटुंबातील चिमुकल्याच्या शैक्षणिक खर्चाची सुध्दा जबाबदारी घेण्याचे ते यावेळी म्हणाले कुटुंबियांना मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी कुटुंबातील लहान चिमुकल्याच्या शिक्षणासाठी हातभार म्हणून आकरा हजार रुपयांची मदत आपल्या “चला देऊ मदतीचा हात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबाच्या जीवनात”या मोहिमे अंतर्गत गावोगाव फिरून,कुटुंबियांची भेट घेऊन घरपोच करत आहेत. चाकुर येथील स्व.ताजोदीन शेख अचानक कोविड महामारी मध्ये मृत्यू पावले व त्यांच्या कुटुंबियांना पदोपदी अडचणींचा सामना करावा लागला.चाकुर येथील कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबास आर्थिक मदत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह यांनी या कुटुंबांना त्यांच्या घरी भेट देत आधार दिला व कुठल्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे.यापुढे तुमच्या कुटुंबाला कोणतीही मदत लागली तर मला सांगा.तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हा व तुमच्या कुटुंबाल मदत करण्यास कटीबध्द आहे.तुम्ही आज पासुन माझी बहीण आहात असे डॉ.नरसिग भिकाणे म्हणाले आकरा हजार रुपयांची मदत केली.काही दिवसांपूर्वीच डॉ. भिकाणे यांनी शेतकरी कुटुंबातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांस खरीप पेरणीसाठी आकरा हजार रुपयांची मदत केली. चाकुर येथील गरीब कुटुंबाला अशीच मदत केली होती.
कोरड्या आश्वासनानपेक्षा छोटीसी मदत माणुसकीची डॉ. भिकाणे
कोविड महामारी मध्ये अपरिमित हानी झाली असून ती कशानेही भरून निघणार नाही परंतु अश्या कुटुंबांना गरज आहे ती मानसिक व आर्थिक आधाराची त्यामुळे मी त्या कुटुंबांना भेट देऊन त्यांना छोटीसी मदत करत आधार देण्याचा प्रयत्न करत.मदत दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे.ते पाहुण मी समाधानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा छोटास प्रयत्न करीत आहे. चाकुर येथील कुटुंबातील कमवता व्यक्ती जाण्याने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. येणाऱ्या काळात अहमदपुर-चाकुर तालुक्यातील कोविड मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबास मदत करणार आहे.माझी मदत तुंटपुंजी जरी असली तरीही ही मदत करुन माझ्या मनाला मनस्वी आनंद होत आहे. अशी प्रतिक्रिया डॉ. नरसिंग भिकाणे यांनी दिली यावेळी मनसे कार्यकर्ते आदींसह उपस्थित होते.