
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव (प्रतिनिधी) दि. २१ : सातत्यांने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नगरपंचायत प्रशांसनाचे लाभ थेट जनतेपर्यत.पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोरेगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. दिपाली महेश बर्गे यांनी राबविलेला नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण सातारा जिल्ह्यात आदर्शवत ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले. कोरेगांव नगरपंचायतीचे विविध दाखले, उतारे थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख १० ठीकाणी उभारलेल्या मोफत नागरिक सुविधा केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी आमदार महेश शिंदे बोलत होते. कार्यक्रमांस कोरेगांव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा सौ. दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनिल बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक राहुल र. बर्गे, साईप्रसाद बर्गे, परशुराम बर्गे, बच्चुशेठ ओसवाल, डॉ. विघ्नेश बर्गे, संतोष बर्गे, अर्जुन आवटे, अॅड. शशिकांत क्षीरसागर, महेश शा. बर्गे, विजय घोरपडे आदी उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले, कोरेगांव नगरपंचायतीचे आमचे सर्व नगरसेवक लोकाभिमुख निर्णय घेऊन एकदिलाने काम करीत आहेत, जे जे लोकोपयोगी आहे, ते प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. जनतेला आवश्यक असलेले दाखले घरपोहोच देण्याचाही उपक्रम स्तुत्य असून आता नगराध्यक्षा दिपाली बर्गे व महेश बर्गे या दोघांनीही पहिल्या दिवसापासून जनतेत उतरुन काम करण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी सुध्दा महेश बर्गे यांनी नगरसेवक म्हणून केलेले काम दिशादर्शक आहे, आज नगराध्यक्ष आपल्या दारी संकल्पनेतून राबविलेला हा उपक्रम सुध्दा निश्चितच कौतुकास पात्र असल्याचेही ते म्हणाले. मागील दोन वर्षात कोरेगांव शहरात सुरु असलेल्या विकासपर्वाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही पाठबळ मिळणार आहे, त्यामुळे आगामी काळात कोरेगांव शहर महाराष्ट्रात आयडॉल करण्याचा प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले.
प्रारंभी महेश बर्गे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दिपाली बर्गे यांनीही मनोगत व्यक्त करुन विविध संकल्पना विशद केल्या. उपनगराध्यक्ष सुनिल बर्गे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कोरेगांव शहरातील नागरिक, कोरेगांव विकास आघाडीचे सदस्य, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी मिळणार सुविधा :-
१) पवार किराणा, कुमठे फाटा
२) योगेश घोडके झेरॉक्स, कोर्टा समोर
३) संतोष ट्रेडर्स, पेट्रोल पंपा समोर
४) निदान ट्रेडर्स, जुना मोटर स्टँड
५) समाधान मोबाईल, आझाद चौक
६) जोतिर्लिंग ट्रेडर्स, मॉडर्न हायस्कूल जवळ
७) श्रीराम मोबाईल, आदर्श कॉलनी
८) उमरदंड किराणा, कॉलेज मागे
९) मेरूकर चिकन, एकंबे रोड
१०) निलेश बर्गे, कृषी कट्टा, जुनीपेठ
११) विजय घोरपडे, नवीन स्टँड समोर
१२) जयभवानी किराणा, सज्जनपुरा
एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध
कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना व्यवसाय दाखले, रहिवासी दाखले यासह दैनंदिन स्वच्छता, घंटागाडी, पथदिवे या समस्येवर तक्रार निवारणही या सुविधा केंद्रावर केले जाणार आहे, त्यासाठी एक नोंदवही सुद्धा ठेवण्यात आली असल्याने या मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे व सर्व नगरसेवकांनी आवाहन केले आहे..नागरिक सुविधा केंद्र शुभारंभ प्रसंगी आमदार महेश शिंदे सोबत राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष सौ. दिपाली बर्गे, महेश बर्गे, सुनील बर्गे आदी.