
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
चिखलाच्या साम्राज्यात प्रवाशांचे खस्ता हाल….
कच, (डस्ट) टाकणे किंवा डांबरीकरण करण्याची मागणी
परभणी जिल्हास्थानी असलेल्या राज्य परिवहन बस स्थानकाची नुकताच कोसळलेल्या संततधार पावसामुळे कमालीची दूरावस्था झाली आहे. साचलेले पावसाचे पाणी, चिखलमय अवस्था परिणामी झालेल्या पातळ चिखलामुळे बस पकडण्याच्या धावपळीत अनेक प्रवासी कधी पाय घसरुन पडतात तर कधी अचानक येणा-या बसमुळे प्रवाशांच्या अंगावर चिखल उडला जावून कपड्यांची फार विटंबना होऊन जाते. महिला वर्ग, लहान लहान मुलं आणि वयोवृध्दांची पूर्ती घमासान होत असते. चिखलाच्या घसरगुंडीमुळे त्या प्रत्येकाला आपला जीव मुठीत धरूनच बसमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागते.
मागील चार वर्षांपासून परभणी बस स्थानकाचे बांधकाम चालू आहे. प्रवासी वर्गाला आपापल्या गावी जाण्या-येण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून स्थानकाच्या दर्शनी भागात प्रवाशांच्या सोईसाठी थोडी अडचणीची ठरली तरी महामंडळाने वाहतूक सुरु ठेवली. निर्माण अडचणींवर मात करून सदर वाहतूक बंद न ठेवता महामंडळाने सहकार्याच्या भावनेतून सुरु ठेवलेली ही सेवा कृत्य कृत्य मानली जावी अशी अपेक्षा करणेही अपेक्षित आहे परंतु प्रवासी वर्गाने सुध्दा ती अडचण लक्षात घेऊन सहकार्य केल्यास चांगलेच राहील. महामंडळ किंवा अधिकारी व कर्मचारी यांनाही सदर बांधकाम लवकर व्हावे अशी अपेक्षाही असणारच परंतु ज्या ठेकेदाराला बसस्थानकाच्या बांधकामाचा ठेका दिला आहे, त्यांनी सुध्दा प्रवाशांची गैरसोय आणि कुचंबना लक्षात घेऊन मानवीय बळ वाढवून प्रलंबित बांधकाम अधिक शीघ्र गतीने पूर्णत्वास नेणे अत्यंत गरजेचे आहे. ख-या औदार्याची अपेक्षा आहे तथापि तसे कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण चिखलमय स्थितीवर मात करण्यासाठी सदर ठेकेदाराने त्या ठिकाणी कच किंवा डस्ट टाकून परिसर चिखलमुक्त करावा. जमल्यास डांबरीकरण करता आले तर अधिकच उत्तम. ह्या कामी लागणारा खर्च मानवीय भावनेतून स्वतः करावा किंवा काही अंशी शासनाकडूनही घ्यावा जेणेकरून प्रवासी नागरिकांची गैरसोय दूर तर होईलच शिवाय टीकेचे लक्ष्य ठरणारे महामंडळ, ठेकेदार, व शासन यांच्या प्रति निर्माण होणारा दोषही कमी होऊन जाईल. असे न झाल्यास व बस स्थानकाचे कामही लवकर पूर्णत्वास न गेल्यास मात्र जनतेच्या तीव्र संतापास सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. निरनिराळ्या संघटना, संस्था, मंडळं, राजकीय पक्ष याच संधीचा फायदा घेऊन आंदोलनं सुध्दा केल्याशिवाय राहणार नाहीत. आगामी काळात महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. ती संधी साधून कांहीजण आंदोलनात्मक पवित्रा सुध्दा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ठेकेदार, महामंडळ, शासन या सर्वांनी मायबाप जनतेचा मानवीय भावनेतून विचार करुन वारंवार टीकेचं लक्ष्य बनले जाणारे परभणी बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल याचा कटाक्ष घेईल एवढी आशा बाळगायला मुळीच हरकत नाही.