
दैनिक चालु वार्ता तालुका वाडा प्रतिनिधी-मनिषा भालेराव
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा संपुर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो , विविध कार्यक्रमाच्या माध्यंमातुन आदिवासी संस्कृतीचे दर्शन या दिवशी पाहायला मिळते, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वाडा तालुका कमिटीच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ग्रामिण रुग्णालय वाडा येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे .
जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा व ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा वेगळ्या उपक्रमाने साजरा करन्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाडा तालुकात आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो,त्यामुळे संयुक्त उत्सव कमिटी मार्फत आयोजित कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय रस्त्यावर दिसतो, संस्कृती, परंपरा, चालिरिती टिकवणे असे विविध कार्यक्रम दरवर्षी वाडा तालुक्यात आयोजित केले जातात, परंतु या सगळ्या कार्यक्रमा बरोबरच आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन या वर्षीचे लक्ष वेधणारे असेल, व वाडा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने रक्तदान करतील असे आयोजकांचे मत आहे .
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे निवेदन तहसिलदार तहसिलदार कार्यालय वाडा, पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन वाडा, मुख्याधिकारी , नगरपंचायत वाडा यांना आज देण्यात आले.
यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा, जिल्हा कमिटी अध्यक्ष अरुण खुलात, वाडा तालुका कमिटी अध्यक्ष दयानंद हरळ , वाडा तालुका कमिटी उपाध्यक्ष संतोष जांजर, तालुका कमिटी सदस्य नरेश ठाणगे, वैभव भोमटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.