
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
अककलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पा पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे पाणी दसरापादर गावाला तिन्ही बाजुनी वेढले असुन गावात पाणी येण्यासाठी चार ते पाच मिटर अंतर राहीले आहे थोड्या दिवसात पाणी गावात शिरून जाईल म्हणून दसरापादर गावाला बुडीत घोषीत करून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी दसरापादर येथील गावकर्यानी बुधवारी तहसीलदार सचिन मस्के यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली होती
त्या अनुषंगाने तहसिलदार सचिन मस्के व कार्यकारी अभियंता चिनावलकर यांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेवुन दुसऱ्या दिवशी दसरापादर गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत गावकर्याशी चर्चा केली व गावकऱ्यांना सध्या तरी गावात पाण्यामुळे धोका नसल्याचे सांगुन उच्चतम पुर पातळीच्या खुणा दाखवुन मार्गदर्शन केले. यावेळी त्याचेसोबत कार्यकारी अभियंता नंदुरबार मध्यम प्रकल्प चिनावलकर, उपअभियंता किशोर पावरा , पोलिस निरिक्षक राजेश गावीत, तलाठी पाडवी उपस्थित होते