
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा
खंडगाव(ह.) :- कंधार तालुक्यातील खंडगाव हमीद येथील माधव रामराव वडजे हे सामाजिक कार्यकर्ते असून गेली १५ वर्षापासून अण्णा हजारे यांच्या संघटनेत काम करतात. गावातील ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे संबंधित व्यक्तीने खोटा कट रचून गुन्हा दाखल केला आहे. त्याचे संपूर्ण पुरावे आहेत. यापुर्वी अनेक वेळा उपोषण करून शांततेच्या मार्गाने शासनाकडे न्याय मागीतला आहे. गावातील यात्रेत पट चालू देणार नाही ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे पोलीस कर्मचारी व यांच्यांत थोडी शाब्दिक वाद झाला. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी यांनेच संबंधित महिलेला पुढे करून अॅट्रॉसिटी गुन्हा नोंदविला आहे. सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे जात पातीचा विषयच येत नाही. त्यांना कुठलेच व्यसन नाही, ते दारू बंद करण्याठी अनेक वेळा शासनाकडे मागणी केली आहे. यापुर्वी त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. त्यांच्यावर भारतबाई गोविंद वडजे हिने बलात्काराचा केस दाखल केली. दोन तीन वर्षे पेशा करून कोर्टाने त्यास निर्दोष केले आहे. बलात्काराची केस निर्दोष निघाली पण, त्यांना जे मानसिक त्रास तीन वर्षे झाला याचाही आपण अधिकारी या नात्याने विचार व्हावा याबाबत आपल्या स्तरावरून शहानिशा कार्यवाही व्हावी असे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, परिक्षेत्र कार्यालय नांदेड व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय कार्यालय कंधार यांना पांडुरंग व्यंकटराव कंधारे सामाजिक कार्यकर्ते पेठवडज व व्यंकटी गोविंदराव जाधव रा. सिरसी बु. ता. कंधार यांनी निवेदन देऊन कळविले आहे. प्रशासनाने सर्व पुरावे तपासून खोटी अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करणार्यांना शिक्षा व्हावी व माधव रामराव वडजे यांच्यावरील खोटी अॅट्रॉसिटी रद्द करून निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी केली आहे.