
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी
देगलूर: आज दिनांक २२/७/२२ रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर यांनी ग्रामपंचायत खानापूर येथे दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन दिव्यांगा सोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सहाय्यक. जिल्हा अधिकारी देगलूर सौम्या शर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे दिव्यांग बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस गावातील सर्व दिव्यांग बांधव व श्रवण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना, च्या महिला उपस्थित होत्या. तेव्हा मा.साह. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांसोबत आधार कार्ड, राशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र बाबत चर्चा करून ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांची यादी तयार करून सादर करण्यासाठी सूचित केले तसेच वरील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या गावात ॒दिवंगमित्र॒ निवड करण्यात येईल असे सांगितले. तसेच ग्रामपंचायत खानापूर येथील सुविधा केंद्र अद्यावत करून दिव्यांगाना योजना मिळवून देण्यासाठी माहितीपत्रक लावण्यात यावे अशा सूचना दिल्या आणि गावातील दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी दिवंगमित्र यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास संसाधन व्यक्तीची निवड करावी अशा सूचना दिल्या यानंतर ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या कामाची माहिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्याकडून घेऊन दिव्यांग बांधवांना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपणाबाबत उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील रस्त्याची विकास कामे पाहणी करत असताना अतिक्रमीत असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करून कामे करावे त्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन गावातील नागरिकांना दिले. त्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल खानापूर येथील शाळेतील स्वच्छता पाणीपुरवठा विकास कामे पोषण आहार ची पाहणी करून विद्यार्थिनीशी संवाद साधला. यावेळी या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शेखर देशमुख गटशिक्षणाधिकारी कृषी अधिकारी श्री ईडोळे साहेब विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी संगमेश्वर कानडे महसूल चे मंडळ अधिकारी तलाठी अनिल सलगर हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी श्री गणेश कोकणे यांनी मांडले व खानापूरचे सरपंच सौ. उज्वला गौतम वाघमारे व जि.प.सदस्या अनुराधा पाटील यांनी स्वागत केले त्यावेळी उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंद पाटील अशोक डुकरे नागेश्वर बक्कनवार भीमराव यनलवार शेषराव कदम गौतम वाघमारे मारुतराव परबते विश्वनाथ ताडकुले रवींद्र कामशेट्टे दयानंद महाराज सुरेश बक्कनवार व इतर दिव्यांग बांधव व गावातील नागरिक व महिला उपस्थित होते.