
दैनिक चालू वार्ता लातूर प्रतिनिधी -प्रा.मारोती बुद्रुक पाटील
कटक येथे पार पडलेल्या नॅशनल फेन्सीग टुर्नामेंट व कॉमनवेल्थ निवड चाचणी स्पर्धेत अहमदपूर येथील लातूर जिल्हा ततवारबाजी संघटनेची स्टार खेळाडू झानेश्वरी शिंदे हिने इप्पी वैयक्तिक प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवला. त्यामूळे दि. 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रिय कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तीची भारतीय संघात निवड झाली आहे. याबद्दल लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री अभिजीत मोरे , सचिव तथा श्री शिवछत्रपती राज्य पुरस्कारप्राप्त प्रा. श्री दत्ता गलाले , महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . काबरा , यशवंत विलयालयाचे मुख्याध्यापक श्री . गंपले ,आहिल्यादेवी माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . प्रशांत माने , किलबिल नॅशनल स्कूलचे प्रमुख ज्ञानोबा भोसले , जय हिंद स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य , लातूर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या सदस्यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .तिला प्रशिक्षक वजिरुद्दीन काजी , वैभव कज्जेवाड , मोहसीन शेख , रोहित गलाले , आकाश बनसोडे , मैफूजखान पठाण यांनी प्रशिक्षीत केले .साधन सुविधेचा अभाव असतानाही अहमदपूर सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूने मिळवलेल्या या यशाबद्दल लातूर जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांकडून ज्ञानेश्वरी शिंदे हिचे व तिच्या प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे .