
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस व देशाच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांचा ऐतिहासिक विजय असा व्दिगुणीत करणारा आनंद भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाने साजरा केला.
शुक्रवार दिनांक २२ जुलै 2022 रोजी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा 52 वा वाढदिवस व देशाच्या ऐतिहासिक निकालातून मताधिक्य घेऊन द्रौपदी मुर्मु यांचा देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शिक्का मोर्तब झाल्याचा व्दिगुणीत करणारा आनंद भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भूम बस स्थानक परिसरात वृक्षारोपण करून साजरा केला.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एनजीओ फेडरेशनचे प्रमुख शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली 52 ठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. या निमित्ताने भूम येथील जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे कार्यवाहक प्रदीप साठे यांच्या पुढाकाराने भूम बसस्थानकाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वृक्षा रोपनसाठी ह.भ.प हाके महाराज, माजी सैनिक हेमंत देशमुख, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर , ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, शहराध्यक्ष शंकर खामकर, ता. चिटणीस बाबासाहेब विर , ता.अध्यक्ष उदयोग आघाडी रमेश बगाडे, अ.जा. शहराध्यक्ष प्रदीप साठे, ता. कोषाध्यक्ष सचिन बारगजे, युवा ता. सरचिटणीस सचिन मस्के, सुधीर साठे, विकास मिसाळ, रफिक शेख व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.