
दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी- संभाजी गोसावी
पुणे शहर हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सरांईत गुन्हेगारांची चांगलीच वाव झाल्यांचे दिसून येत आहे. मात्र हडपसर गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी चांगले सतर्क असल्यांचे प्रशासनाला दिसून येत आहे. अशातच एक पुणे शहर हडपसर परिसरांमध्ये वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांला हडपसर पोलिसांनी त्याच्याकडूंन दहा दुचाकी जप्त करण्यांत पोलिसांना यश मिळाले. त्याने हडपसर, कोंढवा, भारती विद्यापीठ सासवड, येथे दुचाकी चोरल्यांचे तपासांत निष्पन्न झाले. आकाश मनोहर गायकवाड वय २६ रा. हडपसर) असे या आरोपीचे नाव आहे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्हा संदर्भात तपास पथकाने गस्त घालत असताना एका संशयितांच्या हालचालीवरुन गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यांत घेत. पोलीस ठाण्यांत आणून त्यास पोलीस खाक्या दाखवतात त्यांने पोलिसांना चोरीची कबुली दिली. तसेच गायकवाड यांच्याकडूंन अमनोरा कॅम्प येथील वस्तु देण्यासांठी आलेल्या व्यक्तींची चोरीला गेलेली बॅग ही पोलिसांनी यावेळी त्याच्याकडूंन जप्त केली.सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे,पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, प्रशांत दुधाळ ,सुरज कुंभार भगवान हुबडे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.