
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
दिनांक 23 जुलै 2022 रोजी लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी व राजकीय नेत्यांनी आपले योगदान दिले, त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पहिली ते दुसरी (लहान गट) व इयत्ता तिसरी ते चौथी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. लहान गटातून सृष्टी पाटील (प्रथम), मोक्षदा देवरे (द्वितीय), लावण्या पाटील (तृतीय),तर मोठ्या गटातून जय प्रशांत चौधरी (प्रथम), प्रसाद सोनवणे (द्वितीय), दुर्गेश्वरी राजपूत (तृतीय) अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना लगेच अध्यक्षांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यालयाचे मुख्या. आदरणीय ईश्वर पाटील यांनी भूषविले. वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनात व विद्यार्थ्यांची तयारी व मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ शिक्षिका सौ. रेखा माळी, श्री संदीप चौधरी,सौ. सीमा तेले ,लक्ष्मण साळुंखे या शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली. श्री ईश्वर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या जीवन चरित्राविषयी तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या विविध नेत्यांविषयी व त्यांच्या जीवनातील प्रसंगांविषयी माहिती दिली.
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.