दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
गडचांदूर
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट येथील भूपृष्ठ करार करताना झालेला घोळ तसेच बेकायदेशीर आदिवासी जमिनीवर माणिकगड सिमेंट कंपनी कडून झालेले उत्खनन व 18 आदिवासी कुटुंबांना बेघर केल्याची तक्रार जन सत्याग्रह संघटनेने केली होती याबाबत मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दिनांक 21 जुलै 2022 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये प्रशासनिक अधिकारी व तक्रारकर्त्यांची गंभीर दखल घेत माणिकगड सिमेंट कंपनी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात झालेली चुनखडी उत्खनन व आदिवासींच्या अन्याय अत्याचार व अधिवाशावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हे तसेच कंपनीविरुद्ध प्रशासनाकडून आदिवासी कुटुंबाच्या तक्रारीची कोणतीच दखल न घेतल्यानेआदिवासी कुटुंबाने झालेल्या अन्यायाचा लेखाजोखा मानव अधिकार आयोगाकडे सादर केला या प्रकरणात आयोगाने गंभीर दखल घेत जमिनीची भूमापन मोजणी करून कंपनीने दिशाभूल करीत राष्ट्रीय संपत्तीची हानी व अधिवाशांचे शोषण याबाबत भूमापन मोजणी पर्यायाचे संकेत दिल्याने माणिकगड सिमेंट कंपनीच्या सावळा गोंधळ उघड पडणार आहे तसेच याबाबत तीस तारखेला आदिवासी मुंबई येथे आयोगासमक्ष आपल्या अन्यायाचा पाढा सादर करणार आहे यामुळे खळबळ माजली असून कुसुंबी नोकरी खदानी व भूमापन मोजणी शिवाय तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिलेली ताबा प्रक्रिया व प्रत्यक्ष उत्खनन याचा पर्दाफाश लवकरच होऊन आदिवासी कोलाम यांना न्याय मिळेल असा विश्वास प्रकल्प बाधित आदिवासी कुटुंबांनी केला आहे
