
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सेवाकार्य दिवस म्हणून अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्यात आला.या सेवाभावी कार्याच्या माध्यमातून चाांदुरबाजार येथील थिलोरी गावामध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून २५००० हजार मदतकार्य करून त्यांच्या मुलांचा पुढील शिक्षणाचा खर्च स्वतः करणार असल्याचेही सांगितले.त्याचप्रकारे सेवाभावी कार्याच्या माध्यमातून पी.आर.पोटे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिर,आरोग्य सेवा कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच भानखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला सर्व वयोवृद्ध नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा सुद्धा या माध्यमातून देण्यात आला व दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचे सुद्धा वाटप यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीने करण्यात आले.
या सेवाकार्य दिवसामध्ये आमदार प्रवीण पोटे पाटील,शहर अध्यक्ष किरणजी पातूरकर,भाजप प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी,रवींद्रजी खांडेकर,मंगेश खोंडे,दीपक खताडे,गजानन देशमुख,तालुका अध्यक्ष मुरली माकोडे,गोपाल तिरमारे,श्रेयशकुमार पोटे,नरेंद्र देशमुख,अजय सामदेकर,विवेक कलोती,जयंत आमले,श्याम पाध्ये,विवेक चुटके,धीरज बरबुद्धे,सौ वंदनाताई मळघे,आदर्श कोरडे,प्रकाश पूड सह परिसरातील नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.