
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
कोल्हापूर जिल्ह्यांतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना मातृशोक निर्माण झाल्यांची माहिती नुकतीच सोशल मीडियावरुन समोर आली आहे. श्रीमती. सरस्वती बच्चू पाटील यांना वयाच्या ९१ वर्षी त्यांचे कोल्हापुरांतील राहत्या घरी त्यांनी दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता अखेरचा श्वांस घेतला.अगदी कठीण परिस्थिंतीत संघर्ष करायला शिकवणारी माऊली गेल्यांने दादांच्या आयुष्यांत दुःखांची पोकळी निर्माण झाली त्यांच्या निधनांने पाटील कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे कष्टांला कधी कमी पडू नकोस, आयुष्यांत तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांत दादांना त्यांच्या मातोंश्री सरस्वती पाटील यांनी कायम शिकवण दिली. दादांनीही त्यांचे शिकवण कायम अंगीकारली कठीण परिस्थिंतीत संघर्ष करायला शिकवणारी माय माऊली गेल्यांने दादांच्या आयुष्यांत एक पोकळी निर्माण झाली. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही दादांच्या मातोंश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले बच्चू पाटील कापड गिरणीत कामाला असताना पैसे अतिशय कमी मिळत असताना त्यांनी संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांत दादांना शिक्षण दिले संघर्षाची प्रेरणा दिली माझ्या आयुष्यांत प्रवासांत माझ्या आईचा सर्वाधिक वाटा राहिलाय.अशी भावना चंद्रकांत दादां नेहमी बोलून दाखवांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थिंतीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोंश्रीने सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्यांचे संस्कार केले या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करीत आहे. दादांच्या मातोश्री यांचे निधन झाल्यांचे वृत्त राजकीय वर्तुळात समजताच माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध पदाधिकारी व सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांच्यासह सातारा,कोरेगांव तालुका, सांगली,पुणे कोल्हापूर या क्षेत्रांतील विविध मंडळींनी आदरांजली वाहिली.